चळे (दि.4)प्रतिनिधी.
चळे ता.पंढरपूर येथील शहीद देशभक्त विठ्ठल पांडुरंग मिसाळ यांना सोमवार दि.4रोजी अभिवादन करण्यात आले.यांच्या प्रतिमेला आर.पी.आय आठवले गट पंढरपूरचे कार्याध्यक्ष विजय खरे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.चळे गावचे सुपुत्र विठ्ठल मिसाळ हे भारत - पाकिस्तान बांगलादेशच्या मुक्ती संग्राम 4 डिसेंबर 1971 युद्धात शहीद झाले होते.त्यांची आठवण म्हणून शहीद विठ्ठल मिसाळ प्रतिष्ठान व चळे ग्रामस्थ यांच्या वतीने शहीद विठ्ठल मिसाळ यांना अभिवादन करण्यात येते.हनुमान मंदिराजवळ त्यांच्या समाधीला अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी उपसरपंच सुदाम मोरे,मारुती मिसाळ,आप चे तालुकाध्यक्ष बंडू मोरे,माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रताप गायकवाड,सुरेश मोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश मोरे, प्रहारचे संतोष मोरे,चंदनशिवे सर मेजर पांडुरंग पाटील,सिद्धेश्वर खिलारे,रामचंद्र मोरे,संतोष मिसाळ,महेश खिलारे,रमेश नागणे, सुधाकर गायकवाड, कृष्णा गायकवाड,लखन वाघमारे, दर्लिंग फडतरे,विनोद बनसोडे, महादेव कुंभार,विष्णू माने,आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ - चळे येथे शहीद देशभक्त विठ्ठल मिसाळ यांना अभिवादन करताना मान्यवर.


Post a Comment
0 Comments