Type Here to Get Search Results !

चळे केंद्र शाळेत पालक सभा संपन्न,विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सरपंच पुढाकार घेणार.

चळे (दि.19) प्रतिनिधी

     जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चळे येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या माता - पालक - शिक्षक सहविचार सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल सटाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. नुकत्याच संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा समितीचे अध्यक्ष अतुल सटाले यांच्या वतीने हार,फेटा देऊन मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

      सोमवार दि.19 रोजी संपन्न झालेल्या पालक सभेमध्ये मुख्याध्यापिका कल्पना भुसे यांनी प्रास्ताविक करत प्रशालेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधा साठी आवश्यक असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय असल्याचे खंत सभेमध्ये बोलून दाखवली. व त्यावर तोडगा काढण्याची मागणी ही पालक सभेमध्ये करण्यात आली तेव्हा पालक सभेला उपस्थित असलेले सरपंच पती ज्ञानेश्वर शिखरे यांनी आठ दिवसाची मुदत घेत पुढील सोमवार पर्यंत प्रशालेतील असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची अडचण ग्रामपंचायतच्या वतीने सोडवणार असल्याचे आश्वासन प्रशालेस व पालकांना दिले. या आश्वासनाचे पालकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.झालेल्या सभेमध्ये गैरहजर विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड देणे,विद्यार्थ्यांची गुणवत्ता,प्रशालेतील इतर उपक्रम यावर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पालक- शिक्षक यांच्यामध्ये चर्चा झाली.यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून अतुल मोरे,बालाजी फुगारे,सज्जन मोरे यांनी मनोगत व्यक्त करत शाळेच्या गुणवत्तेसाठी काही सूचना मांडल्या.

.....


तर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वतःच्या खर्चाने खेळाडूंची मिरवणूक काढणार.

   नुकत्याच झालेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये केंद्र शाळेने तालुका स्तरापर्यंत यश संपादन केले होते. पुढील वर्षी होणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये शाळा जिल्हा स्तरापर्यंत पोहचली तर यश मिळवलेल्या सर्व खेळाडूंची व शिक्षकांची गावातून वाजत गाजत ट्रॅक्टर मधून मिरवणूक स्वखर्चाने काढणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अतुल सटाले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

    या झालेल्या पालक सभेसाठी पालक समितीचे  अध्यक्ष अतुल सटाले,उपाध्यक्षा अश्विनी वाघ,ग्रामपंचायत सदस्य दिगंबर कुंभार,प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना भुसे यांच्या सह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,माता पालक,शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश बुवा यांनी केले तर आभार विकास बढे यांनी मानले.

   

   

Post a Comment

0 Comments