मोहोळ(दि.24) बालाजी फुगारे
पेनूर (ता. मोहोळ) येथील सौ. तारामती महादेव चवरे (वय 72)यांचे बुधवार (दि.24)रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पेनूर व मोहोळ परिसरात शोककळा पसरली आहे. सौ. तारामती चवरे या अत्यंत मिळूनमिसळून राहणाऱ्या आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात २ मुले, ५ मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.चवरे परिवाराच्या या दुःखात स्थानिक ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभागी होऊन चवरे व माने परिवाराचे सांत्वन केले.
फोटो – सौ.तारामती चवरे
सौ.तारामती चवरे या पेनुरचे ग्रामपंचायत सदस्य श्री. रामदासभाई चवरे यांच्या मातोश्री तर मोहोळचे माजी उपसभापती मानाजीबापू माने यांच्या त्या भगिनी होत्या.

Post a Comment
0 Comments