Type Here to Get Search Results !

सहकार शिरोमणीच्या 2026–27 गळीत हंगामाचा वाहतूक तोडणी कराराचा शुभारंभ

 भाळवणी (दि.19) बालाजी फुगारे 

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी या कारखान्याचा 2026–27 या हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक करार चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.



   हा शुभारंभ ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालक रवींद्र मोरे,काकासाहेब पवा,रत्नाकर गायकवाड,प्रवीण पाटील, नागनाथ रेडे ,सुधीर भोसले, महादेव काळे यांच्या शूभहस्ते करण्यात आला.

    यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारतनाना कोळेकर,ऊस तोडणी वाहतूक कमिटीचे चेअरमन मोहन नागटिळक ,कारखान्याचे संचालक सुरेश देठे,युवराज दगडे, सुनील पाटील, अमोल माने ,अरुण नलवडे,  ज्योतीराम पोरे ,कारखान्याचे जनरल मॅनेजर साळुंखे साहेब मुख्य शेती अधिकारी देशमुख, ऊस पुरवठा अधिकारी हरिभाऊ गिड्डे, केनयार्ड सुपरवायझर सटाले साहेब,कामगार संघटनेचे अध्यक्ष बंडू पवार,ओरसेल, कारखाना कार्यक्षेत्रातील हितचिंतक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments