Type Here to Get Search Results !

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारितेचा स्तर उंचावला - संदीप काळे सोलापूरमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जिल्हा अधिवेशन उत्साहात, शेकडो पदाधिकारी, पत्रकार यांनी नोंदविला सहभाग.

सोलापूर(दि.27) प्रतिनिधी

    "जागतिक स्तरावर पत्रकारितेवर आलेले संकट दूर करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने गेल्या पाच वर्षांत उचललेली पावले अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत. या काळात राबवलेले अनेक उपक्रम पत्रकारितेचा इतिहास निर्माण करणारे आहेत," असे गौरवद्गार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी काढले.जगातील ५८ देशांत आंतरराष्ट्रीय पत्रकारितेचा झेंडा रोवणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने सोलापूर येथे जिल्हा पदाधिकारी आणि सदस्यांसाठी एकदिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

या अधिवेशनाला ज्येष्ठ पत्रकार आश्विनी कोळेकर (पुणे), पत्रकारिता अभ्यासक अभय दिवाणजी, ‘तरुण भारत’चे संपादक प्रशांत माने, प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ,श्री भोज हॉटेलचे मालक नामदेव विठ्ठलराव पाटील,मंगळवेढ्याचे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राहुल ताड,उद्योजक अनिस नदाफ यांच्यासह जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे, जिल्हा उपाध्यक्ष तौफिक नदाफ, सोलापूर महानगराध्यक्ष धनराज बगले आणि राज्य कोर टीम सदस्य सुरज कौलगे यांची प्रमुख उपस्थिती होती.



पत्रकारितेसाठी कृतिशील कार्यक्रमांवर आम्ही कसा भर देतोय यावर संदीप काळे पुढे म्हणाले की, "संघटनेची भक्कम बांधणी आणि कृतिशील कार्यक्रमांमुळेच आमचा ७८ देशांतील प्रवास सोपा झाला. महाराष्ट्रातून सुरू झालेली ही संघटना आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे, कारण प्रत्येकाला ही आपली संघटना वाटते. येत्या दोन वर्षांत १९५ देशांत पत्रकारितेचा झेंडा फडकवण्याचा आमचा संकल्प आहे."

यावेळी आश्विनी कोळेकर यांनी पत्रकारितेतील संवेदनशीलता अधोरेखित करताना सांगितले की, पत्रकारितेत समाजाचे अश्रू पुसण्याची ताकद असून लोकशाही बळकट करण्यासाठी संघटनेचे कार्य मोलाचे आहे. अभय दिवाणजी यांनी पत्रकारांचे प्राथमिक प्रश्न सोडवण्यावर भर दिला, तर प्रशांत माने यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना अधिक सखोल प्रयत्नांची गरज व्यक्त केली.जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. अधिवेशनात संघटनेचे कार्य, पत्रकारितेची भूमिका, आणि माझा सहभाग या विषयांवर सोलापूर जिल्ह्यासाठी विविध ठराव पारित करण्यात आले. तसेच, आगामी दोन महिन्यांची रूपरेषा सर्व तालुकाध्यक्षांनी सादर केली.



अधिवेशनातील उपस्थिती व पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या अधिवेशनाला सोलापूर जिल्ह्यातील विविध विंगचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये रेडिओ विंगच्या जिल्हाध्यक्ष शहाजोया सुभेदार, उर्दू विंगचे जिल्हाध्यक्ष वजाहत अब्दुल सत्तार, उर्दूचे जेष्ठ पत्रकार आयुब नल्लाबंधू ,अब्दुल मजीद शेख डॉ. म.शफी चोपदार, अकिब मडकी, मैनुद्दीन नदाफ, महिला विंग च्या सोलापूर महानगराध्यक्ष श्रेया माशाल व त्यांच्या टीमचा समावेश होता.तसेच, उत्तर सोलापूरचे सचिन राठोड, सांगोल्याचे कैलास हिप्परकर व शहराध्यक्ष प्रवीण शिवपुजे, माळशिरसचे आण्णा भोसले, पंढरपूरचे सुरज कौलगे, अक्कलकोटचे हुसेनी भाईजान नदाफ, मंगळवेढ्याचे रोहिदास भोरकडे व शहराध्यक्ष विक्रम घुले, दक्षिण सोलापूरचे बनसिद्ध देशमुख,आणि मोहोळचे विजय पुजारी यांच्यासह त्यांच्या कार्यकारीणीतील सदस्यांनी आपली भूमिका मांडली.

दिवसभर चाललेल्या या अधिवेशनात पत्रकारितेच्या भविष्याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली.


फोटो ओळ: सोलापूर येथे आयोजित ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरम च्या जिल्हा अधिवेशनाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे. व्यासपीठावर आश्विनी कोळेकर, अभय दिवाणजी, प्रशांत माने, अजितदादा कुंकुलोळ, उद्योजक अनिस नदाफ, बालाजी फुगारे  व अन्य पदाधिकारी.

Post a Comment

0 Comments