पंढरपूर(दि.16) बालाजी फुगारे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या अंतर्गत आयोजित श्रीमंत विजयसिंह राजे भोसले क्रिकेट चषक आंतर-महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे दिनांक १३ डिसेंबर रोजी अत्यंत उत्साही व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले.या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्र.कुलसचिव डॉ. अतुल लकडे सर उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था,सातारा अमरजीत पाटील सर महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. बी.एस.बलवंत, उपप्राचार्य, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवृंद, कर्मचारी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले क्रिकेटप्रेमी यांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.
पंढरपूर –कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे श्रीमंत विजयसिंह राजे भोसले क्रिकेट चषक आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेचे उद्घाटन करताना मान्यवर.
या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देणे, संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड आंतर विद्यापीठ या राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धांसाठी केली जाणार असल्याने खेळाडूंमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
ही स्पर्धा एकूण तीन मैदानांवर खेळविण्यात येत असून मैदान क्रमांक १ — कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, मैदान क्रमांक २ — रेल्वे मैदान, पंढरपूर आणि मैदान क्रमांक ३. — स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे सामने रंगतदार पद्धतीने सुरू आहेत. सर्व सामने ४० षटकांच्या मर्यादित स्वरूपात खेळविण्यात येणार आहेत.उद्घाटनप्रसंगी मा.कुलसचिव डॉ. अतुल लकडे सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रातील सातत्य, परिश्रम आणि खिलाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.व उत्कृष्ट आयोजन व नियोजनाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले.
या स्पर्धेमुळे पंढरपूर व परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, तरुण खेळाडूंमध्ये स्पर्धात्मक भावना, आत्मविश्वास आणि संघभावना वाढीस लागली आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता असून, आगामी सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले.

Post a Comment
0 Comments