पंढरपूर(दि.1) बालाजी फुगारे.
मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई येथील 'आझाद मैदान' येथे 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू आहे.या उपोषणाला राज्यभरासह पंढरपूर , मंगळवेढा,माढा,तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत आहे.आज या उपोषणाला भाजपचे नेते,सोलापूर जिल्ह्याचे विधानपरिषदेचे माजी आमदार प्रश्नांत परिचारक यांच्या पाठिंब्याचे पत्र प्रणव परिचारक यांनी मुंबई येथे दिले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची पहिली मागणी भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती.तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा मतदार संघांचे चे आमदार अभिजीत पाटील यांनी पाहिल्यादिवासासून या आंदोलनात सक्रिय असून मुंबई येथे उपोषणाला जाण्यासाठी सकल मराठा समाजाला आवाहन केले होते.तर भगीरथ भालके यांनीही या आंदोलनाला मुंबई येथे उपस्थित राहून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल सावंत, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आता या आंदोलनाला प्रशांत परिचारक यांच्यावतीने प्रमुख परिचारक यांनी पाठिंबाचे पत्र दिले आहे.
यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यासंबंधीची प्रणव परिचारक यांनी त्यांच्या फेसबुक वरती पोस्ट केली आहे.


Post a Comment
0 Comments