पंढरपूर(दि.30) बालाजी फुगारे.
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोपाळपूर येथे उद्या (दि.31) रोजी स्वेरी लॉ कॉलेज, याच्यासह सुसज्ज भव्य क्रीडांगण व मुलींच्या 9 मजली चौथ्या वसतिगृहाचे उद्घाटन समारंभ व पायाभरणी सोहळा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ना.चंद्रकांत पाटील ना.जयकुमार गोरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध आमदार आणि मान्यवर नेतेमंडळींच्या उपस्थितीत होणार आहे.
स्वेरी च्या माध्यमातून गोपाळपूरच्या माळरानावर मागील २७ वर्षां मध्ये शिक्षणाचे नंदनवन उभारले आहे. या संस्थेच्या माध्यमातून तंत्रशिक्षणाचे ज्ञानामृत अनेक पिढ्यांना समृद्ध केले आहे.या माध्यमातून तंत्रशिक्षणाची 'ज्ञानगंगा' ग्रामीण भागात प्रवाहित करण्यात स्वेरी यशस्वी ठरत आहे. स्वेरी पंढरपूरच्या यशस्वी आणि गौरवशाली रौप्यमहोत्सवी वाटचालीसोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या श्रेणीत असणाऱ्या विधी महाविद्यालयाची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये करीत आहे.
स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर, नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाशझोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण यांचे उद्घाटन आणि मुलींचे ९ मजली नूतन वसतीगृह क्र. ४ चा पायाभरणी सोहळा रविवार, दि. ३१/०८/२०२५ रोजी, सकाळी ठिक ८.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा) अध्यक्ष, जयकुमार गोरे (ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सोलापूर जिल्हा) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आ.अभिजित पाटील,आ.समाधान आवताडे, मा.आ. प्रशांत परिचारक,आ.राजू खरे, मा.आ.अॅड. शहाजी पाटील, मा.आ.राम सातपुते, आ.बाबासाहेब देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी कार्यक्रम स्थळी आपली बहुमूल्य उपस्थिती दर्शवून आमचा आनंद वृद्धिंगत करावा अशी विनंती स्वागतोत्सुक प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केली आहे.या कार्यक्रमास अशोक भोसले अध्यक्ष, सुरेश राऊत उपाध्यक्ष, प्रा. डॉ. सुरज रोंगे, सचिव, सर्व विश्वस्त, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर (स्वेरी) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस गोपाळपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण


Post a Comment
0 Comments