चळे(दि.23) बालाजी फुगारे.
कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरचे सभापती हरिषदादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त चळे ता.पंढरपूर येथे हरिषदादा गायकवाड मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवार दि. 23 रोजी चळे येथील सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराबरोबरच गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम दर्शन या ठिकाणीही वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले होते.चळे येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन चे ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच सुदाम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
फोटो – सभापती हरिषदादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना सुदाम मोरे व पदाधिकारी.
यावेळी राजमाता अर्बन बँक मंगळवेढा चे संचालक अण्णासाहेब गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य युवराज गायकवाड, बापूसाहेब सरिक,माजी उपसरपंच राजाराम गायकवाड, चळे विकास सेवा संस्था नंबर 2 चे चेअरमन श्रीनिवास बनसोडे,माजी चेअरमन धनाजी वाघ, मधुकर वाघ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बडवस्तीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड,विठ्ठल बनसोडे,सुभाष गायकवाड,माजी चेअरमन रामचंद्र व्यवहारे, मा.ग्रा.पं.सदस्य विजय निर्मळ,श्री स्वामी महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे संस्थापक रामचंद्र शिंदे, मुन्ना पुजारी, आर.पी. आय चे तालुकाध्यक्ष विजय वाघमारे,दर्लिंग अर्थमुव्हर्स चे अनिल गायकवाड, चळे विकास सेवा संस्था नंबर 2 चे सचिव अविनाश सुतार,उत्तम वाघ,औदुंबर गायकवाड,शहाजी गायकवाड, पी.जी.गायकवाड,रांजणी विद्या मंदिर रांजणी चे माजी प्राचार्य तुळशीराम वाघ,सदाशिव शिंदे,भाऊसाहेब निर्मळ,सुरेश घाडगे,बालाजी पोरे,बबन गायकवाड,श्रीकांत पंडित,नितीन वाघमारे,राजू निर्मळ,पांडुरंग कारखान्याचे राजाराम घोडके,हुसेन शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ – चळे येथे आयोजित रक्तदान शिबिरास भेट देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड व चळे येथील विविध संस्थांचे पदाधिकारी.


Post a Comment
0 Comments