Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ.समाधान आवताडे यांच्या वतीने विठ्ठलाची महाआरती अन् तुळशीपूजा करून दीर्घायुष्याची प्रार्थना केली.

पंढरपूर(दि.22) बालाजी फुगारे.

         राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुलसीपुजनाच्या माध्यमातून व नामदेव पायरी येथे महाआरतीतून मुख्यमंत्री महोदयांच्या दीर्घायुष्याकरिता व निरोगी आयुष्याकरिता पंढरपूर–मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रार्थना केली.


फोटो – विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त महाआरती करताना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आ.समाधान आवताडे.

        आज मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत जाहिरात, होर्डिंग,मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर अनावश्यक खर्च न करता संपुर्ण पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार श्री समाधान दादा आवताडे यांच्या माध्यमातून महारक्तदान शिबिरे तसेच ५५,५५५ झाडांचे वृक्षारोपन व संवर्धन यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस सेवा दिन म्हणून संपूर्ण मतदार संघात साजरा केला जात आहे.

    "मा.देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदारसंघात व राज्यात ही‘‘महाराष्ट्र सेवकाचा वाढदिवस’’ हा खऱ्या अर्थाने सेवाभाव व समर्पित कार्यातून साजरा होतो आहे, हीच नेतृत्वाची खरी ओळख आहे " – आमदार समाधान आवताडे.

Post a Comment

0 Comments