Type Here to Get Search Results !

मनसेच्या पाठपुराव्याला यश, ग्रामपंचायत कडून पाच टक्के दिव्यांग निधीचे वाटप. चळे(दि.5) बालाजी फुगारे.

चळे(दि.5) बालाजी फुगारे

       दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायत स्तरावरील पाच टक्के निधी वाटप करण्यासाठी मनसेचे तालुका उपाध्यक्ष बालाजी गोवे यांनी पाठीमागील आठ ते दहा दिवसापासून सातत्याने ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मामीला आज (दि.5) रोजी यश आले असून दिव्यांग बांधवांना रोग स्वरूपात निधी प्राप्त झाला आहे. दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी मिळावा यासाठी त्यांनी ग्रामपंचायत चळे यांच्याकडे लेखी निवेदन ही दिले होते. जर दिव्यांग निधी वाटत नाही झाला तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही गोवे यांनी दिला होता. 



फोटो – चळे ग्रामपंचायत कडून 5% निधी स्वीकारताना दिव्यांग बांधव.

     त्यांच्या या उपोषणाच्या इशाऱ्याची दखल घेत चळे ग्रामपंचायतच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधीचे रोख स्वरूपात वाटप ग्रामपंचायत कार्यालय मध्ये पदाधिकाऱ्यांच्या व दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले.प्रत्येकी 1000 प्रमाणे चळे येथील  32 दिव्यांग बांधवांना 32 हजार रुपये रोख स्वरूपात वाटप करण्यात आले.

   यावेळी चळे ग्रामपंचायत सरपंच ज्ञानेश्वर शिखरे,उपसरपंच दिपक मोरे,ग्रामपंचायत सदस्य अतुल मोरे, विठ्ठलचे माजी संचालक संतोष गायकवाड,आप्पासाहेब कोळी, रमेश लंगोटे,माजी सरपंच औदुंबर मोरे,नागनाथ गायकवाड,दिव्यांग बांधव बाळू वाघमारे,भिकाजी वाघमारे,सचिन गायकवाड,सद्दाम मुलानी,चेतन गायकवाड यांच्यासह मनसेचे दादा वाघमारे,विजय वाघमारे,सोमनाथ कोळी.

     मनसेचे तालुका उपाध्यक्ष बालाजी गोवे यांनी सातत्याने पाठपुरावा करत दिव्यांग बांधवांना निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल दिव्यांग बांधवांच्या वतीने बालाजी गोवे यांचे व चळे ग्रामपंचायतचे आभार मानण्यात आले

Post a Comment

0 Comments