चळे (दि. 11) बालाजी फुगारे.
चळे तालुका पंढरपूर येथील येथील राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 11वाजता घाडगे निवास, बरड वस्ती चळे येथे बारावा वर्धापन दिन व पंढरपूर तालुका कार्यक्षेत्रात शुभारंभ होणार असून या यानिमित्त भव्य महिला मेळावा आयोजित केला असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक रामदास घाडगे यांनी दिली आहे.
राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण बिगर शेती हि पतसंस्था चळे येथे कार्यरत असून ग्रामीण भागामध्ये गेली बारा वर्षे चळेतील नवीन उद्योजक व व्यावसायिकांना आर्थिक मदत देऊन पद्धतीने सातत्याने सहकार्य केले आहे.मागील बारा वर्षापासून सातत्याने चांगली सेवा देत असतानाच आता राजमाता जिजाऊ पतसंस्थेचा कार्य विस्तार वाढला असून ही पतसंस्था आता फक्त चळे साठी मर्यादित न राहता संपूर्ण पंढरपूर तालुका कार्यक्षेत्र राहणार आहे.
या पतसंस्थेचा पंढरपूर तालुका कार्यक्षेत्र शुभारंभ उद्या जिजाऊ जयंती निमित्त होणार असून हा कार्यक्रम पतसंस्थेच्या चेअरमन चंद्रभागा घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, अवंती पाटील,एबी मराठीच्या सहसंपादक पूजा गायकवाड, यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून सर्व सभासदांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे संस्थापक रामदास घाडगे यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments