माळशिरस (दि.13) - प्रतिनिधी.
दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी दहिगाव हायस्कूल दहिगाव या प्रशाले वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाषराव माने होते तर प्रमुख पाहुणे माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर ,अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे,माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानराज पाटील,फ्लोरा उद्योग समूहाचे प्रमुख मोहित जाधव उपस्थित होते.
दहिगाव हायस्कूल, दहिगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार उत्तमराव जानकर.
यावेळी प्राचार्य दादासाहेब कोळी, प्राचार्य लक्ष्मणराव शिंगाडे यांच्या सह संस्थेच्या अध्यक्षा वंदनादेवी विठ्ठलराव पाटील ,संस्थेच्या संचालिका वनितादेवी विठ्ठलराव पाटील,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर,सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,तसेच दहिगाव नगरीचे सरपंच सोनमताई रणजीत खिलारे, ग्रामपंचायत सदस्य,सर्व पालक व विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख पाहुणे आमदार उत्तमराव जानकर यांनी केले. प्रा.सुभाषराव माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचा अविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली.उपस्थित पालक , ग्रामास्थ, प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment
0 Comments