चळे(दि.27) - बालाजी फुगारे.
चळे तालुका पंढरपूर येथे सातत्याने सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा प्रश्न मागील अनेक दिवसापासून निर्माण झाला आहे. गावातील नागरिकांना सार्वजनिक पाणीपुरवठा करत असताना ग्रामपंचायतीला अनेक अडचणी येत होत्या. अनेक वर्षापासून गावाला एक दिवसात पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच चळे ते बरड वस्ती या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम सुरू झाल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे गावाला सार्वजनिक पाणीपुरवठा करता येत नव्हता.
मागील सहा दिवसापासून दर्लिंग मंदिराकडील असणाऱ्या पाणीपुरवठा विहिरीवरून येणारा पाणीपुरवठा हा बंद होता. पाणी बंद असल्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधील विठ्ठल मंदिर परिसर, हनुमान मंदिर परिसर,सुतार गल्ली, कुंभार गल्ली येथील नागरिकांना अनेक संकटाशी सामना करावा लागत होता.त्यामुळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवराज दिनकर गायकवाड यांनी आपल्या स्वतःच्या विहिरीतील पाणी हे पाणीपुरवठा योजनेसाठी दिल्याने सध्या तरी गावातील सार्वजनिक पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
फोटो - युवराज गायकवाड यांच्या मुख्य पाईपलाईनला जोडण्यात आलेली सार्वजनिक पाणीपुरवठ्याची पाईप.
युवराज गायकवाड यांनी स्वतःच्या विहिरीतील पाणी सार्वजनिक पाणीपुरवठा साठी दिल्याने मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पाणीटंचाईचा प्रश्न हा गायकवाड परिवाराच्या सामाजिक बांधिलकीमुळे सध्या तरी सुटला आहे. यापूर्वीही गायकवाड परिवार यांनी नागरिकांना पाणी वाटप केले होते. त्यामुळे ग्रामस्थांकडून गायकवाड परिवाराचे कौतुक होत आहे.
पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च होत आहेत मात्र या पाणीपुरवठ्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Post a Comment
0 Comments