Type Here to Get Search Results !

महा-ई-सेवा केंद्र राज्याच्या संघटनेचे रविवारी शिर्डी येथे अधिवेशन

पंढरपूर(दि.5) बालाजी फुगारे.

      अखिल भारतीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेंटर केंद्र यांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी दिनांक(दि.8) रोजी शिर्डी येथे होणार आहे.तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्र चालकांनी व आधार चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील कोरके व पंढरपूर तालुकाध्यक्ष दत्तात्रय मोरे-पाटील यांनी केले आहे.

        अखिल भारतीय महा-ई-सेवा यांची महाराष्ट्र संघटना असून ही संघटना महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्रप्रमुख यांचे प्रश्न सोडवण्यासाठी,भविष्यातील अडीअडचणी सोडवण्यासाठी,तसेच महा-ई-सेवा केंद्र व आधारचालकावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी भविष्यात काम करणार आहे.

    त्याच पार्श्वभूमीवर दि.8 डिसेंबर 2024 रोजी शिर्डी येथे संघटनेचे अधिवेशन होणार आहे. तरी भविष्यातील महा-ई-सेवा केंद्र व आधारचालकाच्या समस्या सोडवण्यासाठी अधिवेशनात प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व केंद्र चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा प्रमुख सुनील कोरके व पंढरपूर तालुकाप्रमुख दत्ता मोरे-पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments