Type Here to Get Search Results !

दर्लिंग दूध संकलन केंद्रातर्फे लाभांश वाटप.

चळे(दि.2)बालाजी फुगारे.

  चळे तालुका पंढरपूर येथील दर्लिंग दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादक सभासदांना लाभांश देत दूध उत्पादक सभासदांची दिवाळी गोड केली. सन  2023 -24 या वर्षाचा दूध उत्पादकांना प्रतिलिटर 1 रुपया प्रमाणेचा 48 दूध उत्पादक सभासदांना 5 लाख 61 हजार रुपयांचा बोनस दीपावली पाडव्याच्या निमित्ताने वितरण करण्यात आला.

   यावेळी संस्थेच्या वतीने दूध उत्पादक सभासदांमध्ये स्पर्धा ठेवण्यात आली होती त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक संजय शत्रुघ्न मोरे बक्षीस 5000 रोख, व्दितीय उमेश सिद्धेश्वर घाडगे रोख रक्कम 3000, तृतीय सौरभ खिलारे 2000, चतुर्थ पारितोषक 1000 सर्जेराव सुदाम प्रक्षाळे यांना देण्यात आले.



      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंगचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, विठ्ठल चे संचालक, उमेशकाका मोरे, ग्रामपंचायत सदस्य अतुल मोरे,उपसरपंच दीपक मोरे,प्रगतशील शेतकरी बाळासाहेब मोरे,माजी मुख्याध्यापक कुबेर फुगारे,दशरथ येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दलिंदर संकलन केंद्राचे चेअरमन सुधाकर मोरे यांनी केले तर प्राअतुल मोरे यांनी सूत्रसंचालन केले.संदीप मोरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments