मोहोळ - दि.21.बालाजी फुगारे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार दि.२२ ऑगस्ट रोजी मोहोळ येथे जनसंवाद यात्रा घेऊन येणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार राजन पाटील, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत,
तरी या जनसंवाद यात्रेला मोहोळ मतदार संघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावून सहकार्य करावे,असे आवाहन मोहोळ विधानसभा मतदार सघांचे आ.यशवंत माने यांनी केले आहे.या मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेशी संवाद साधणार असून नागरिकांच्या अडचणी समजून घेणार आहेत.ही जनसंवाद यात्रा मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळी 11 वाजता होणार आहे. यापूर्वी ही जनसंवाद यात्रा 23 ऑगस्ट रोजी होणार होती,मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा असल्याने ही जनसंवाद यात्रा रद्द झाली होती.
शासनाच्या विविध योजना संघ तसेच मतदारांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा सुरू असून या जन समाजातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या जनसंवाद यात्रेसाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतदार,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, तसेच महायुती घटक पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments