सोलापूर (दि.20)प्रतिनिधी.
V 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडी व काँग्रेस (आय) पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ, दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता कासेगाव, ता.पंढरपूर येथे जाहीर सभेचे आयोजन केले असून या सभेला संबोधित करण्यासाठी आमदार अमित देशमुख,आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम हे उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून प्रणिती शिंदे तर महायुतीकडून आमदार राम सातपुते ही निवडणूक लढवत आहेत. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्याच्या आज तीन ते चार सभा होणार असून या प्रचाराच्या माध्यमातून निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेत प्रणिती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे.

Post a Comment
0 Comments