सोलापूर (दि.19) प्रतिनिधी.
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जयंतीनिमित्त सोलापूर येथील बोधिवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने करंजकर विद्यालय,शंताई अनाथ आश्रम व गांधी नगर भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. बोधिवृक्ष सामाजिक संस्था ही छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारी संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात.येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचे काम बोधिवृक्ष सामाजिक संस्था करणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष ऍड.आकाश इंगळे यांनी दिली.
महापुरुषांची जयंती ही विचारांची जयंती म्हणून साजरी करत करावी असे मत बोधिवृक्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आकाश इंगळे यांनी मांडले.यावेळी संस्थेचे संस्थापक आकाश इंगळे, संस्थेचे मार्गदर्शक व सोलापूर जिल्ह्यातील नामवंत वकील मा. राज मात्रे,मार्गदर्शक शिवाभाऊ गायकवाड, विनयभाऊ गायकवाड, राहुल वाघमारे, भीम क्रांती तरुण मंडळाचे अध्यक्ष युवराज तूपसाखरे, बोधिवृक्ष समाजिक संस्थेचे उत्सव अध्यक्ष इमरान शेख,दिनेश चव्हाण, अनिकेत मोरे,अनिल ढेकणे, संतोष माटेठी, सागर साळुंखे, आप्पा मरूमकर, दौलाभाई शेख, सुरज गायकवाड, दीपक चव्हाण व बोधिवृक्ष सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह सिध्दलिंगेश्वर विजापूरे, दिनेश चव्हाण , विकी ठेंगले उपस्थित होते.करंजकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री तडकसे,सचिव श्रीमती धानमा मधली, सदस्य अजय मधली यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्रीदेवी येळमेली यांनी केले तर आभार लक्ष्मण पवार यांनी मानले.
उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments