प्रतिनिधी (दि.22)
संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत असून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात 16 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहेत.पुढील आठवड्यात PM किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर पीएम किसानच्या अधिकृत हँडलवरून असे सांगण्यात आले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात 16 व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित केला जाणार आहे. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केला जाणार आहे. आतापर्यंत या योजनेचे एकूण 15 हप्ते देण्यात आले असून 16वा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Post a Comment
0 Comments