पंढरपूर (दि.११) - प्रतिनिधी.
सोलापूर पासून पंढरपूर तिऱ्हे मार्गे रोड वरील एसटी वाहतूक सुरळीत सुरू ठेवा अन्यथा आम्हाला रस्ता रोको आंदोलन करावे लागेल. असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्राहक समितीचे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रियांका परांडे यांनी दिला आहे.सोमवारी(दि .११)रोजी सोलापूर आगार व्यवस्थापक यांना ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने निवेदन देऊन वरील इशारा देण्यात आला आहे. यामध्ये आठ दिवसांमध्ये ही एस टी ची सुरळीत वाहतूक न चालू झाल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
ग्राहक समिती संस्थापक अध्यक्ष तानाजी गुंड , यावेळी ग्राहक समिती महिला प्रदेशाध्यक्ष प्रियंका परांडे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले .यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष कोल्हाळ ,सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष मंगलताई नाईकनवरे, युवतीआघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा भोसले,मोहोळ तालुकाध्यक्ष बबनबन नरोटे,मोहोळ तालुका उपाध्यक्ष किसन गायकवाड उपस्थित होते.
या सोलापूर पंढरपूर तिऱ्हे मार्गावर अनेक गावांचा समावेश आहे. या मार्गावरून नियमित होणारीएस टी ची वाहतूक विस्कळीत झाली आहे यामुळे विद्यार्थी, महिला यांचेसह वयोवृद्ध नागरिकांना अडचणीचे झाले आहे . यामुळे एस टी महामंडळ यांनी आपली सेवा सुरळीत करावी अशी मागणी ग्राहक समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments