कोंढारकी (प्रतिनिधी)
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढारकी येथील विद्यार्थ्यांना वह्या व पेन या शैक्षिणक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाप्रसंगी धाराशिव कारखान्याचे कार्यकारी अधिकारी अमर पाटील,विठ्ठल कारखान्याचे संचालक अशोक घाडगे,प्रगतशील बागायतदार समाधान गायकवाड,हनुमंत मोरे,ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील,राम पाटील,अज्ञान दांडगे,गणेश दांडगे, हनुमान पाटील,सचिन मांजरे,सागर पाटील गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते .
यावेळी अमर पाटील यांनी विद्यार्थ्यांना य मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र फुगारे यांनी केले तर आभार शाळेतील दत्तात्रय शिखरे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments