चळे (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चळे येथील मुख्याध्यापिका कल्पना भुसे यांना सन 2021 बावीस चा सोलापूर जिल्हा परिषद चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.आज शुक्रवार दि.८ रोजी सोलापूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला.भुसे यांनी शिष्यवृत्ती पंढरपूर तज्ञ मार्गदर्शक, स्कॉलरशिप सांगोला तज्ञ मार्गदर्शक, कला प्रशिक्षण पंढरपूर तालुका तज्ञ मार्गदर्शक, योगासने व कराटे पंढरपूर बीटस्तर तज्ञ मार्गदर्शक, साक्षरता अभियान तज्ञ मार्गदर्शक पंढरपूर तालुकास्तर,मुल्य शिक्षण बीटस्तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.त्यांनी शाळांमध्ये वृक्षारोपन मोठ्या प्रमाणात केले.
कल्पना भुसे यांना शैक्षिणक,सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे यापूर्वीचा जिल्हास्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे.कोरोनाच्या काळात त्यांनी ऑनलाईन वर्गाध्यापण करत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधली होती.तसेच सेतू अभ्यासक्रम स्वखर्चाने देवून प्रभावी अध्यापन केले होते.भुसे यांना २०१८-२०१९ या वर्षाचा पंढरपूर पंचायत समितीचा ही आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता..
मुख्याध्यापिका भुसे या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे जून २०२३ रोजी रुजू झाल्या आहेत.त्यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार घेतल्यानंतर मुख्याध्यापक पदाबरोबरच वर्ग अध्यापन ही करत पालकांशी सातत्याने समन्वय ठेवत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत. भुसे यांना आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने त्यांच्या अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment
0 Comments