Type Here to Get Search Results !

मंगळवेढा शहर व परिसरातील अतिक्रमण मोहीम स्थगित - आ.समाधान आवताडे







मंगळवेढा (प्रतिनिधी)

मंगळवेढा शहर व परिसरात होऊ घातलेली अतिक्रमण मोहीम स्थगित करण्यात आली आहे.मंगळवेढा शहरातील छोटे - मोठे दुकानदार,व्यापारी पेठा,कोरोना महामारीनंतर मोठ्या अडचणीत आल्या होत्या, त्यातच लांबलेला पाऊस आणि येणारे सण उत्सव,राखी पौर्णिमा, बैल पोळा,गणेशोत्सव,नवरात्र महोत्सव हे सण व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असताना, अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवेढा शहरात राबवण्यात  येणार होती. परंतु या अतिक्रमण मोहीम संदर्भात आमदार समाधान  अवताडे यांनी स्थगित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती मिळत आहे.

आ.आवताडे हे सध्या तेलंगाना मध्ये आहेत. त्यांनी नगर पालिका प्रशासक,उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मोहीम स्थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने दिनांक 25 ऑगस्ट रोजी होऊ घातलेले अतिक्रमण मोहीम स्थगित केली आहे.

व्यापाऱ्यांमध्ये धास्ती 

एसटी स्टँड परिसर व इंग्लिश स्कूल परिसर या परिसरातील काही विक्रेत्यांनी या मोहिमेची धास्ती घेऊन स्वतःहून अतिक्रमणे काढली होती.परंतु काल रात्री उशीर पर्यंत झालेल्या संबंधित प्रशासन अधिकारी यांना आमदार महोदयांनी अतिक्रमण मोहिमे स्थगित करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार हे अतिक्रमण मोहीम स्थगित करण्यात आली आहे.येणारे सणासुदीचे दिवस पाहता ही मोहीम स्थगित झाल्यामुळे छोटे व्यवसाय करणारे यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



Post a Comment

0 Comments