मंगळवेढा(प्रतिनिधी)
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे सध्या मंगळवेढा तालुक्यात जोरदार तयारी करताना दिसत आहेत.मागील काही दिवसांमध्येच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवेढा येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून शरद पवार केले होते.तसेच शरद पवार यांना सर्व पक्षातील सदस्य, पदाधिकारी सोडून जात असताना अभिजीत पाटील हे मात्र निष्ठेची भूमिका बजावताना दिसत आहेत.
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री अभिजीत पाटील यांनी आज दिनांक २१ऑगस्ट रोजी माचनूर येथील प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.या वेळी मंदीर समितीचे पदाधिकारी, तसेच माचनूर गावचे सदस्य, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments