Type Here to Get Search Results !

प्रदीप गायकवाड यांचा सन्मान.


चळे (प्रतिनिधी)

  चळे तालुका पंढरपूर येथील प्रदीप राजाराम गायकवाड यांची महाराष्ट्र उच्च शिक्षण संचनालय (MDHE) आयोजित पदभरती द्वारे श्री बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण ता: सातारा येथे सहाय्यक प्राध्यापक Group:- A Grade:- II ( अराजपत्रित) पदी नुकतीच निवड झाली.त्या निवडीबद्दल श्री दर्लिंग विद्या मंदिर व भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय चळे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिषदादा गायकवाड, बाजार समितीचे माजी संचालक हिरालाल शेख यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

    प्रदीप हे 2019 साली सेट परीक्षा,तर 2021साली नेट उत्तीर्ण झाले आहेत.प्रदीप हे मागील तीन वर्षापासून पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील प्राणीशास्त्र विभागमध्ये अध्यापनाचे कार्य करत होते.2023 pathn येथे निवड.या पद भरतीची जुलै 2023 मध्ये मुलाखत झाली.प्रदीप हे चळे ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच राजाराम गायकवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत.या सत्कार निवडी प्रसंगी चळे ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच अनिल गायकवाड,राजमाता अर्बन बँक मंगळवेढा चे संचालक आण्णासाहेब गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य युवराज गायकवाड,तानाजी गायकवाड,बालाजी वाघमारे,संतोष बनसोडे,प्राचार्य जे.बी.गायकवाड उपस्थित होते.

फोटो ओळ - प्रदीप गायकवाड यांचा सन्मान करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड 

Post a Comment

0 Comments