Type Here to Get Search Results !

MIT पंढरपूरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन.

 पंढरपूर(दि.10) बालाजी फुगारे 

    पंढरपूर येथील MIT कॉलेज यांच्या वतीने 10 वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन सत्राचे 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत एम. आय.टी कॉलेज कॅम्पस सभागृह पालखी तळाजवळ वाखरी येथे आयोजित करण्यात आले आहे.या मार्गदर्शन सत्रामध्ये JEE, NEET, MHT-CET, NDA, Navy, Army, Air Force यांसारख्या स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.



कार्यक्रमात करिअर निवड, अभ्यास पद्धती, वेळेचे नियोजन आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक टिप्स यांवर विशेष भर दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा मिळण्यास मदत होणार आहे.या मार्गदर्शन सत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून कर्नल डी. के उपाध्याय आणि विवेक वेलणकर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9209043739 या क्रमांकावर संपर्क साधावा.


विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पाऊल उचलावे असे आवाहन प्राचार्य एम.आय.टी कॉलेज वाखरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments