पंढरपूर(दि.28) – बालाजी फुगारे
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात दि. 29 व 30 जानेवारी 2026 रोजी इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी फॉर द इंडियन इकॉनॉमी या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.
या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठचे कुलगुरू मा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने होणार आहे .तसेच या कार्यक्रमात बीजभाषक म्हणून गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे येथील प्रा. डॉ. प्रकाश वनकडे हे मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.जे.जी. जाधव साहेब उपस्थित राहणार आहेत.
वी या कार्यक्रमासाठी आय.आय.टी. अहमदाबादचे प्रा. डॉ.प्रवीण जाधव ,डॉ. अनिलकुमार वावरे, प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड , प्रा. डॉ .केदार मारुलकर आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या चर्चासत्रामध्ये प्राध्यापक, संशोधक यांनी सहभाग घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव साहेब यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments