चळे(दि.6) बालाजी फुगारे.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व श्रद्धेय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे विश्वासू सहकारी कै.भास्करआप्पा गायकवाड यांच्या 23व्या पुण्यतिथी निमित्त गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी कै.भास्करआप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय व श्री दर्लिंग विद्या मंदिर चळे येथे आप्पांच्या प्रतिमेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरांजली वाहण्यात आली.यावेळी प्रशालेचे प्राचार्य,पर्यवेक्षक,शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, आणि कृषी यासारख्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे,सर्वसामान्य लोकांचे आधारवड, शेतकऱ्यांना नेहमी मदत करणारे पंढरपूर तालुक्याचे धाडशी नेतृत्व अशी आप्पांची ओळख होती.
फोटो – गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे कै.भास्करअप्पा गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करून अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.
6 सप्टेंबर हा दिवस,आप्पांची पुण्यतिथी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील नागरिकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश दादा गायकवाड, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप गुरव, श्री सिद्धिविनायक ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सचिव अमोल हरिष गायकवाड, चळे ग्रामपंचायत सदस्य युवराज गायकवाड,तानाजी गायकवाड,सुशील वाघमारे,श्री दर्लिंग विद्यामंदिर व कलेजासी भास्कर अप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोळी, पर्यवेक्षक रतिलाल गायकवाड,समाधान मोरे उपस्थित होते.
फोटो – चळे येथील कै.भास्करआप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय व श्री दर्लिंग विद्यामंदिर येथे भास्करआप्पा गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षदा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.



Post a Comment
0 Comments