पंढरपूर(दि.14) – बालाजी फुगारे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत अंतर -महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूरने वर्चस्व गाजवले आहे.विद्यापीठस्तरीय ज्युदो स्पर्धा ही छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय,सोलापूर येथे पार पडली.
फोटो – सुवर्ण पदक विजेती चंद्रिका बाबर .
या स्पर्धेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूरचे नऊ विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यापैकी चंद्रिका बाबर हिने ७८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले या विद्यार्थिनीची भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे, तसेच पवन रुपनवर १०० किलो वजनी गटात रोप्य पदक मिळविले आहे.
फोटो ओळ – पवन रूपनर 100 किलो वजनी गटातील रौप्य पदक विजेता.
यशस्वी खेळाडूंना कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर चे प्राचार्य डॉ. बी.एस. बलवंत, जिमखाना विभागातील शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.वि.बी.फुले,प्रा.एम.बी.खपाले वरिष्ठ विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनिल परमार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सर्व शिक्षक उप-प्राचार्य व विभाग प्रमुख, संचालक मंडळ व सर्व कर्मचारी यांनी कौतुक केले. तसेच पुढील भोपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


Post a Comment
0 Comments