पंढरपूर(दि.10) बालाजी फुगारे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा मंगळवेढा येथील कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय येथे मंगळवार दि.9 रोजी संपन्न झाली.या स्पर्धेमध्ये पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला आहे.या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 22 महाविद्यालयाने सहभाग घेतला होता.
फोटो – मंगळवेढा येथे झालेल्या अंतर महाविद्यालय स्पर्धेतील पंढरपूरचा मुलींचा विजेता संघ ट्रॉफी स्वीकारताना.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय,नातेपुते या संघाने पटकावला व द्वितीय क्रमांक सांगोला महाविद्यालय सांगोला यांनी पटकावला. तर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर मुलींच्या कबड्डी संघाने उत्कृष्ट खेळी करून तृतीय क्रमांक पटकावला.या महिला कबड्डी संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन प्राचार्य डॉ. बी.एस.बळवंत,उपप्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे, डॉ.राजेश कवडे,डॉ.गजधने,डॉ. अनिल चोपडे, डॉ.उमेश साळुंखे व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, जिमखाना विभाग सदस्य,शिक्षक कर्मचारी यांनी केले.तसेच या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, प्रा.विठ्ठल फुले आणि प्रा.मनोज खपाले यांचे मार्गदर्शन लाभले.
हा विजय कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासाठी खूप अभिमानाची बाब असून या सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाकडून विशेष कौतुक करण्यात आले.या सामन्या मधील निवड झालेल्या खेळाडूंना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे प्रतिनिधित्व करता येणार आहे.

Post a Comment
0 Comments