चळे(दि.20) बालाजी फुगारे.
चळे तालुका पंढरपूर येथे अंतर्गत रस्त्याची दुरावस्था कायम असून बर्ड वस्ती कडे जाणाऱ्या घाडगे कृषी केंद्र ते जनावरांचा सरकारी दवाखाना या रस्त्यावर असणाऱ्या रस्त्यावरती सिमेंटची मोठी नळी फुटली असून ती नळी सध्या अपघाताला आमंत्रण देत आहे.
घाडगे कृषी केंद्र ते जनावरांचा सरकारी दवाखाना या रस्त्यावरती मागील काही महिन्यापूर्वीच खासदार निधीतून सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम झाले असून या काँक्रीट रस्त्यापासून केवळ पाच ते दहा फुटावरती खालच्या बाजूला ओढ्यातील पाणी जाण्यासाठी मोठी सिमेंट नळी टाकण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसात ती नळी फुटले असून ती नळी अपघाताला आमंत्रण देत आहे.
फोटो ओळ - घाडगे कृषी केंद्र ते सरकारी दवाखाना या रस्त्यावरती काँक्रीट रस्त्याच्या खालच्या बाजूला नळीला पडलेले मोठे भगदाड.
सध्या ऊस वाहतूक हंगाम सुरू असून या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी,ऊसाने भरलेले मोठे ट्रेलर, दूध वाहतूक करणारे पीक अप यांची नेहमी रहदारी असते त्यामुळे ही नळी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
" एक-दोन दिवसांमध्ये या रस्त्याची पाहणी करून बांधकाम विभागाकडून उपाययोजना केली जाईल" - श्री.लोटके साहेब ,J.E. बांधकाम विभाग, पंढरपूर.

Post a Comment
0 Comments