चळे (दि 30)बालाजी फुगारे
पंढरपूर तालुका महा-ई-सेवा चालक संघटनेची मासिक सभा दिनांक 29 रोजी पंढरपूर येथे संपन्न झाली. या झालेल्या मासिक सभेमध्ये महा-ई-सेवा चालक पंढरपूर तालुका संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी चळे ता. पंढरपूर येथील स्वराज महा ई सेवा केंद्राचे चालक दत्तात्रय आप्पासो मोरे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी समाधान गुंड, सचिवपदी आझाद अल्लापुरकर, कोषाध्यक्ष प्रवीण पवार, सहसचिव योगेश साळसकर,सह कोषाध्यक्षपदी महबूब शेख यांची निवड करण्यात आली.
फोटो- पंढरपूर तालुका महा-ई-सेवा चालक संघटनेचे पदाधिकारी.
या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मोहसीन इनामदार, सुहास माळी,सुनील कोरके,किशोर वाकसे यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments