पंढरपूर(दि.21)बालाजी फुगारे.
गौरी गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असताना अनेक ठिकाणी गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू बाल गोपालांमध्ये तर गणेश मूर्तींचे विशेष आकर्षण पण तीच गणेश मूर्ती पर्यावरण पूरक बनवली आणि स्वतः बनवली तर त्या मूर्तीचे कौतुक अधिकच असते. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी विश्वशांती गुरुकुल वाखरी ता.पंढरपूर येथील एम.आय.टी गुरुकुल व रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.रोटरी क्लबच्या क्षितिजा गाताडे यांनी विविध प्रात्यक्षिक सादर करून, प्लॅस्टर ऑफ पॅरिस विरहित पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याचे तंत्रज्ञान सहज व सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना करून दाखविले.
यावेळी बोलताना एम आय टी ज्यू कॉलेज चे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ यांनी सण, उत्सव साजरे करताना पर्यावरणचा समतोल राखणे हि काळाची गरज आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी कॉलेजच्या हेडमिस्ट्रेस सौ शिबानी बॅनर्जी मॅडम, स्कूल चे प्राचार्य श्री शिवाजी गवळी सर, सौ गवळी मॅडम,रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ . जान्हवी माखिजा, सचिव श्री स्वप्नील कोंडगुळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयटी गुरुकुल वाखरीच्या सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments