चळे (दि.22).प्रतिनिधी - बालाजी फुगारे.
चळेपाटी ते चळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यापूर्वीच आमदार यशवंत माने यांच्या विशेष प्रयत्नातून चळेपाटी ते चळे हा रस्ता तात्पुरती दुरुस्ती करून व्यवस्थित करण्यात आला होता. या रस्त्यावरील बहुतांश पडलेल्या खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता प्रवाशांसाठी हा रस्ता चांगला बनवण्यात आला होता. मात्र हा रस्ता तयार झाल्यानंतरच अवघ्या काही दिवसातच कोंढारकी येथील जलजीवन मिशन अंतर्गत दांडगे वस्ती या ठिकाणी पाण्याची उंच टाकी उभारली असून त्या टाकीतून जनजीवन मिशनचा पाणीपुरवठा करण्यासाठी रस्त्यावरती चारी खोदली आहे.
संबंधित ठेकेदाराने काम झाल्यानंतर तो रस्ता व्यवस्थित करणे आवश्यक असताना मात्र तात्पुरती डागडुजी करत,बाजूचा मुरूम उचलून चारी वरती टाकण्यात आला होता. त्यानंतर मृग नक्षत्राचा आता जोरदार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे खोदलेली चारी तब्बल अर्धा फुट खचली असून,ही खोदलेली चारी सध्या धोकादायक बनली आहे. रस्ता चांगल्या असल्यामुळे गाडी अचानक त्या खड्ड्यांमध्ये थांबवता येत नसल्यामुळे खड्ड्यातून गाडी जोरात आढळून पुढे जात आहे.मागील चार ते पाच दिवसांमध्ये या चारी मध्ये गाडी जाऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून बांधकाम विभागाला या संदर्भात कळवले असून सुद्धा बांधकाम विभागाकडून या गोष्टीकडे तात्काळ उपाययोजना केली जात नाही.
त्यामुळे नागरिकांनी आपल्या जीवाची स्वतःच काळजी घेत चळेपट्टी ते चळे रस्त्यावरून प्रवास करत असताना दांडगे वस्ती जवळ आल्यानंतर रस्त्याच्या मध्ये चारी खोदले आहे तेथून सावकाश जाऊन आपला जीव वाचवने आवश्यक आहे. बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदार ला पाठीशी न घालता त्याच्याकडून हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे अन्यथा संबंधित बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करायचा इशारा चळे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments