पंढरपूर(दि.10) प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील नरखेड गावाचे माजी सरपंच प्रकाश काशीनाथ धोत्रे (वय 48 )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नरखेड ग्रामपंचायतचे ते सलग दहा वर्ष सरपंच होते.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचे ते कनिष्ठ बंधू होते.त्यांच्या अकाली निधनाने मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. नरखेड येथील स्मशाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment
0 Comments