Type Here to Get Search Results !

श्री दर्लिंग विद्या मंदिरचे चित्रकला परीक्षेत यश.

चळे (दि.8) प्रतिनिधी

      चळे तालुका पंढरपूर येथील श्री. दर्लिंग विद्या मंदिर व भास्करआप्पा गायकवाड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय ड्रॉईंग परीक्षा- इलेमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. 

     


या दोन्ही परीक्षेला प्रशालेतील 60 विद्यार्थी बसले होते.परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.त्या विद्यार्थ्यांना एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणांचा लाभ मिळणार आहे.सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक विजय पाटील,रतीलाल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड, प्राचार्य जे.बी.गायकवाड,पर्यवेक्षक टी.एम.भोसले सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments