चळे (दि.28) प्रतिनिधी.
चळे तालुका पंढरपूर येथे मंगळवार दि .28रोजी सकाळी5.45 वाजता तुरळक पाऊसाने हजेरी लावली. हवामान खात्याने 28 आणि 29 तारखेला पावसाचा अंदाज वर्तवण्यात होता. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे.चळे परिसरामध्ये ऊसतोड सुरू झाली असून या पावसाचा ऊस तोडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा फटका हा द्राक्ष,डाळिंब पिकाला होण्याची शक्यता आहे.
V मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बीड जालना सातारा या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हवामान फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने शेती करणे हे किती अनिश्चित स्वरूपाची आहे याचे पुन्हा उदाहरण समोर येत आहे. अवकाळी पावसाने मात्र शेतकरी पुरता हवालदील झाला आहे.
Post a Comment
0 Comments