चळे, प्रतिनिधी
चळे येथील जगदंब नवरात्र तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव निमित्त शनिवार दि.२१ रोजी सकाळी ९वाजता भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या शुभहस्ते होणार असून या शिबिरासाठी पंढरपूर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अरुण फुगे,पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी रक्तदात्यानी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी व परिसरातील नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदंबा नवरात्र तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments